मित्रांनो
नमस्कार व नव वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा! आज पासून माझा हा नवीन ब्लोग सुरु करीत आहे.
ब्लॉग ब्लॉग आणि ब्लॉग, इतके झाले आहेत कि आता कोणता ब्लॉग वाचवा हेच कळत नाही. वाचावे कधी आणि आपण आपल्या ब्लोगवर लिहावे कधी ही एक गहन प्रश्न समोर येऊन उभा ठाकतो.
म्हणून मी ह्या नवीन वर्ष्यापासून एक युक्ती शोधून काढली असून जे माझे आवडीचे आणि वाचनीय ब्लॉग आहेत त्यांना माझ्या एका ब्लॉगवर एकत्र करून एक ब्लॉग कल्लोळ तयार केला आहे.
यातील पहिला मान मी अर्थातच माझी कन्या जीवनिका हिच्या ब्लॉग ला देऊ इच्छितो. तिच्या ब्लॉगचे नाव आहे ‘थोडेसे मनातले’.
नंतर चे बरेच ब्लॉग आवडीचे आहेत पण अनुक्रमांक कसा द्यावा हा प्रश्न आहे. मी माझ्या पसंतीने अनुक्रमांक देत आहे. कृपया राग मानू नये.

दुसऱ्या क्रमांकावर आहे- ‘काय वाटेल ते’
माझे परम मित्र श्रीयुत महेंद्र कुलकर्णी यांचा हा अतिशय सुरेख व वाचनीय ब्लॉग आहे.

अनुजाने पुण्याला आल्यावर मला हक्काने बोलावून घेतले. त्यांना आग्रह मी डावलू शको नाही. आमची आम्ही पुण्याला आल्यावर चांगलीच ओळख झाली. त्यांच्या अनुक्षारे ह्या ब्लॉगचा तिसरा क्रमांक आहे.

तन्वी चा सहजच ब्लॉग मी पहिल्यांदा सहजच वाचला आणि मी त्या ब्लॉगच्या प्रेमात पडलो. असा हा सहजच तयार केलेला सहजच ब्लॉग चौथ्या क्रमांकावर मी घेत आहे.
